Keshav Upadhye : "उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे मला पाहा आणि..."; खेडमधील सभेवरून भाजपाचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 02:37 PM2023-03-06T14:37:02+5:302023-03-06T15:08:27+5:30
BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. केवळ सत्ताच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावण्याची वेळ आली. शिवसेनेचे बहुतांश आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे पक्षसंघटना मजबूत करण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे राहिले. त्यात आता पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेत आहे. त्यातीलच पहिली सभा रत्नागिरीच्या खेड येथे पार पडली. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
"कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ‘मला पाहा फुल वाहा’" असं म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. तसेच "दुनिया सगळी वाईट... माझं बरोबर मीच चांगला हेच ठाकरेंच धोरण" असंही म्हटलं आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ‘मला पाहा फुल वाहा’ लोकप्रतिनिधी वाईट कारण ते सोडून गेले. निवडणूक आयोग वाईट कारण त्यांनी निकाल दिला."
कालच @OfficeofUT यांच भाषण म्हणजे ‘मला पहा फुल वहा’
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 6, 2023
◾️लोकप्रतिनिधी वाईट कारण ते सोडून गेले
◾️निवडणूक आयोग वाईट कारण त्यांनी निकाल दिला
◾️आमदारकीसाठी मदत केली पणभाजपा वाईट
◾️न्यायालयाने विरोधात निकाल दिला की त्यांच्यावर दबाव
दुनिया सगळी वाईट
माझ बरोबर मीच चांगला हेच ठाकरेच धोरण
"आमदारकीसाठी मदत केली पण भाजपा वाईट. न्यायालयाने विरोधात निकाल दिला की त्यांच्यावर दबाव. दुनिया सगळी वाईट... माझं बरोबर मीच चांगला हेच ठाकरेंच धोरण" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. खेडच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली. ही सभा अतिविराट होती, या गर्दीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले.
अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली. खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची ही सभा झाली. सत्तासंघर्षानंतर पहिली जाहीर सभा झाली. हे मैदान तुडुंब भरलेले आहेत. रस्ते दोन्ही बाजूने तुडुंब भरलेले आहेत असा दावा माजी खासदार अनंत गीते यांनी केला. व्हिडिओवरून उद्धव ठाकरेंच्या सभेला किती गर्दी होती याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"