Keshav Upadhye : "एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?"; भाजपाचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:30 AM2023-05-29T11:30:10+5:302023-05-29T11:36:34+5:30

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray Over Matoshri and saamana editorial | Keshav Upadhye : "एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?"; भाजपाचा खोचक सवाल

Keshav Upadhye : "एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?"; भाजपाचा खोचक सवाल

googlenewsNext

नव्या संसद भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. संसदेची नवीन इमारत बांधणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदींनी सन्मान केला. जवळपास 971 कोटी रुपये खर्चून बांधलेले, नवीन संसद भवन भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे. नवी संसद भवन त्रिकोणी आकारात बांधण्यात आली आहे. मात्र सामनाच्या अग्रलेखातून यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?" असा खोचक सवाल भाजपाने विचारला आहे. तसेच भाजपामध्ये थारा नाही. भाजपा म्हणजे एक कुटुंबाची मालकी नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं म्हटलं आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेची इमारत स्वतःसाठी नाही बांधली. भारताच्या भविष्याचा विचार करून देशासाठीच बांधली आहे. एक 'मातोश्री' असताना ‘मातोश्री २’ बांधला तेव्हा कोणता विचार होता?"

"संसद भवन उद्घाटनावेळी झालेले सगळे विधी आपल्या महान प्राचीन परंपरेचा अध्यात्मिक वारसा जपणारे होते. ‘सेंगोल’ची काठी करणाऱ्या लोकांना ते समजण्याची अपेक्षा नाहीच. घराणेशाही, एका कुटुंबाची सत्ता उलथून टाकल्याच्या रागातून टीका करणे योग्य नाही. घराणेशाहीला भाजपामध्ये थारा नाही. भाजपा म्हणजे एक कुटुंबाची मालकी नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे."

"राजेशाही, हुकूमशाही ह्याबद्दल तुम्ही न बोललेलं च बरं. बाकी सामना मध्ये कितीही रेघोट्या मारल्या तरी जनतेच्या मनातली मोदींची प्रतिमेवर काहीच परिणाम होणार नाही" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. यासोबतच ज्ञानोबा माऊलींचे शब्द नवीन संसदेच्या भिंतीवर कोरले आहेत! कुठे मराठी अस्मितेच्या नावाने खोटे गळा काढणारे आणि कुठे महाराष्ट्राची संस्कृती देशाच्या हृदयावर कोरणारे मोदीजी..." असं देखील आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


 

Web Title: BJP Keshav Upadhye Slams Uddhav Thackeray Over Matoshri and saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.