विश्वास नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:29 AM2021-10-03T05:29:12+5:302021-10-03T10:17:16+5:30

शासकीय अधिकाऱ्यांसंदर्भातील ही तक्रार असल्याने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात काय कारवाई झाली याबाबत अहवाल मागितला जाईल.

BJP Kirit Somaiya Complaint against Vishwas Nangre Patil in National Human Rights Commission | विश्वास नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

विश्वास नांगरे पाटील अडचणीत येण्याची शक्यता; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल

Next
ठळक मुद्देकिरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्याकडे आलेली नाही. माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडे येऊ शकतेविश्वास नांगरे पाटलांविरोधात सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली तक्रार घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला. 

नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या संदर्भातील तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली असेल, तर यासंदर्भात आधी राज्य सरकारला विचारणा करून कृती अहवाल मागितला जाईल, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून, नांगरे-पाटील  महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करीत आहेत, त्यांनी सहा तास घरात कोंडून ठेवल्याचा आरोप केला होता.  यासंदर्भात सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूरला जात असताना मला मुंबईतच रोखण्यात आले व घरात डांबून ठेवण्यात आले. घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला. 

दरम्यान, सोमय्या यांनी दिल्लीत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याची माहिती दिली. मुश्रीफ यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या जावयाला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

तक्रारीची शहानिशा करू -डॉ. मुळे
यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, किरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्याकडे आलेली नाही. माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडे येऊ शकते; परंतु शासकीय अधिकाऱ्यांसंदर्भातील ही तक्रार असल्याने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात काय कारवाई झाली याबाबत अहवाल मागितला जाईल. त्यानंतर ते प्रकरण आयोग हाताळेल. 

Web Title: BJP Kirit Somaiya Complaint against Vishwas Nangre Patil in National Human Rights Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.