१६ चोरांनी मिळून केलेली 'हात मिळवणी' असते, वज्रमूठ नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:05 PM2023-04-04T14:05:57+5:302023-04-04T14:06:31+5:30

या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असं आशिष शेलार म्हणाले.

BJP leader Ashish Shelar criticized Uddhav Thackeray | १६ चोरांनी मिळून केलेली 'हात मिळवणी' असते, वज्रमूठ नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

१६ चोरांनी मिळून केलेली 'हात मिळवणी' असते, वज्रमूठ नाही; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला

googlenewsNext

मुंबई -  देशातील १४५ पक्षांमधील सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. या टवाळांनी परवा सभा घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीची म्हणे वज्रमूठ. यांना साधंही कळत नाही की, वज्रमूठ एका ताकदवान माणसाची असते. १६ जण एकत्र मिळून करतात त्याला हात मिळवणी म्हणतात त्याला वज्रमूठ म्हणत नाहीत. १६ चोरांनी मिळून केलेली ही हात मिळवणी आहे अशा शब्दात भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

आशिष शेलार म्हणाले की, इतके वर्ष आमच्याबरोबर राहून त्यांच्या मनातली इच्छा होती. जे त्यांच्या पोटात होतं ते बोलून चुकले. भाजपाला नामशेष करू. त्यांना नामशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे का? असा आमचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीला नामशेष करायचे म्हणजे काय? त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नामशेष करायचे होते का?. त्यांना अटक करण्यासाठी केलेला प्रयत्न आता उघड झाला आहे. त्यांना अमित शहा यांना नामशेष करायचे आहे का? तुम्ही नामुष्कीने जगत आहात. या महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब येऊन नामशेष करायची भाषा करत होता. याच महाराष्ट्रात आता कलियुगामध्ये औरंगजेबी स्वप्न उद्धव मांडत आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे औरंगजेबी हिरवं स्वप्न आहे ते समोर दिसते आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी मुंबईसाठी काय करणार आहे ते सांगावे. मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले ते सांगावे. राष्ट्रीय पातळीवरील धोरण काय सांगावे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा प्रवास अधोगतीकडे चालला आहे. आता तर तो मुंबईकर आणि मराठी माणसाच्या जीवावर उठला आहे असा गंभीर आरोप शेलारांनी उद्धव ठाकरेंवर लावला. 

दरम्यान, मुंबईत घडलेल्या तीन घटना पाहता हा प्रवास उद्धव ठाकरे यांच्या औरंगजेबी स्वप्नाकडे वाटचाल असल्याचे दिसते. त्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप घेतला. आक्षेप एमआयएम, समाजवादी पार्टीने नाही घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीने, मनसेने घेतला नाही. हिंदू जन आक्रोश मोर्चा लव जिहाद आणि लॅंड जिहादवर होता. त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण उद्धव ठाकरे यांनी सांगावे हा आमचा प्रश्न आहे असंही शेलारांनी मागणी केली. 

Web Title: BJP leader Ashish Shelar criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.