“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 04:02 PM2023-05-13T16:02:02+5:302023-05-13T16:11:39+5:30

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. निकालांनंतर भाजप नेत्याची टीका.

bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav thackeray sanjay raut karnataka election result ekikaran samiti | “एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

googlenewsNext

“कर्नाटकातले जे ट्रेण्ड आणि निकाल समोर दिसतायत ते आम्हाला अपेक्षित असलेले निकाल नाहीत. अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. काँग्रेसच्या बाजूनं झुकाव दिसतोय. भारतीय जनता पार्टी याबाबत विश्लेषण, विच्छेदन, विचार करेल आणि संवाद करून आवश्यक तो निर्णय घेईल,” अशी प्रतिक्रिया भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. 

“काँग्रेस जिंकल्यावर यांच्या मनात उकळ्या फुटायला लागल्या. दुसऱ्यांच्या घरात काही झाल्यावर पेढे वाटायचं काम उद्धव ठाकरे आणि संजय राऊत करतील. आता उद्धव ठाकरे माध्यमांसमोर येऊन आकाडतांडव करतील. उद्धव ठाकरे आणि राऊंतांच्या शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार. ते आता केरला स्टोरी, बंजरंग दलावर बंदीची मागणी करतील. हनुमान चालिसाला विरोध त्यांनी आधी केलाच आहे. कर्नाटकात काँग्रेसनं विशिष्ट वर्गाचं लांगूलचालन करण्याचा जो प्रकार केला, तोच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडून आम्हाला अपेक्षित आहे. मात्र या विरोधात आमचा विचारांचा संघर्ष सुरूच राहील,” असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र एकीकरण समिती बाबतचा निकाल दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे. पण जिथे जिथे संजय राऊत जातील तिथे तिथे पराभव त्यांच्या लोकांचा होईलच. संजय राऊत तिथे गेल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीला झटका खायला लागलाय हे त्यातलं सत्य असल्याचं म्हणत त्यांनी निशाणा साधला.

Web Title: bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav thackeray sanjay raut karnataka election result ekikaran samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.