“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:41 IST2023-04-07T12:38:39+5:302023-04-07T12:41:19+5:30
भाजप नेत्याचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल

“केतकी चितळेच्या वेळी संताप आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला…”
शिवसेनेत झालेल्या बंडाळीत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. आमदार सर्वप्रथम गुजरातमधील सुरत, त्यानंतर आसाममधील गुवाहाटी आणि मग गोवा असा प्रवास करत महाराष्ट्रात आले. या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर, राज्यातही सत्तातर घडून आले. त्यानंतर, विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या समर्थकांनी ५० खोके, एकदम ओक्के असे म्हणत त्यांना लक्ष्य केलं. काही दिवसांपूर्वी यावर एक रॅपही व्हायरल झाला होता. आता, या रॅपरला अटक करण्यात आली आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. यावरून आता भाजप आमदारनं त्यांच्यावर निशाणा साधलाय.
अखेर 'रॅपर' राम मुंगासेला अटक, रोहित पवार संताप व्यक्त करत म्हणाले...
“संताप हा विकार आहे आणि रोहित पवारांनी त्यावर विजय मिळवला आहे. त्यांना तो त्यांच्या सोयीने व इच्छेने कधी कधी येतो. केतकी चितळेच्या वेळी आला नाही, पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला,” असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला.
संताप हा विकार आहे आणि रोहित पवारांनी त्यावर विजय मिळवला आहे...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 7, 2023
त्यांना तो त्यांच्या सोयीने व इच्छेने कधी कधी येतो...
केतकी चितळेच्या वेळी आला नाही पण राम मुंगासेच्या वेळी मात्र हुकमी आला... pic.twitter.com/dTpl8qAcwT
कायम्हणालेरोहितपवार?
“आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलंय.