“रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”

By जयदीप दाभोळकर | Published: January 2, 2021 03:31 PM2021-01-02T15:31:57+5:302021-01-02T15:35:08+5:30

PMC Bank Fraud : भाजपा नेत्यानं लगावला टोला

bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena ravindra waikar pmc bank fraud pm narendra modi letter | “रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”

“रविंद्र वायकरांचा फक्त नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला”

Next
ठळक मुद्देPMC बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते रविंद्र वायकरांनी पंतप्रधानांना लिहिलं होतं पत्र.चौकशीसाठी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती शुक्रवारी जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली. पीएमसी बँकेतील घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.

"भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रविंद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता,  फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला...," असं म्हणत भातखळकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून वायकर यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र शेअर करत निशाणा साधला आहे. 



काय आहे प्रकरण?

पीएमसी घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ईडीने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली.

ईडीच्या चौकशीत असे समोर आले की, राऊतने षडयंत्र करत ९५ कोटींची फेरफार केला. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे / करार मिळून आले नाहीत. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समोर आले.

वर्षा राऊत यांना मंगळवारी चौकशीला बोलावले 

या व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावत २९ डिसेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी ५ जानेवारीपर्यंत ईडीकडे वेळ मागितला. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावत ५ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले.

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena ravindra waikar pmc bank fraud pm narendra modi letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.