ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; भाजप नेत्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 11:44 AM2021-01-20T11:44:18+5:302021-01-20T11:51:50+5:30

१६ जानेवारीपासून देशभरात सुरू करण्यात आली आहे लसीकरण मोहीम

bjp leader atul bhatkhalkar criticize thackeray sarkar over corona virus vaccination program in maharashtra less numbers | ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; भाजप नेत्याचा आरोप

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन; भाजप नेत्याचा आरोप

Next
ठळक मुद्दे१६ जानेवारीपासून देशभरात सुरू करण्यात आली आहे लसीकरण मोहीमलसीकरणात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर तर कर्नाटक पहिल्या स्थानी

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं देशात सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना परवानगी दिली. त्यानंतर १६ जानेवारीपासून देशात लसीकरम मोहिमेला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही मोहीम सुरू करण्यात आली. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं कोणत्या राज्यानं आतापर्यंत किती जणांना लस दिली याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हा आठव्या क्रमांकावर आहे. यावरूनच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

"कोविडची लस तयार आहे, परंतु महाराष्ट्र सरकारचे हलेडुले सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम देशभरात सुरू असून या यादीत  ठाकरे सरकारचा क्रमांक ८ वा आहे. फक्त टक्केवारीत नंबर वन," असं म्हणत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला. 



अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केंद्र सरकारची एक यादी जाहीर केली आहे. १९ जानेवारी २०२१ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत देशभरातील कोणत्या राज्यात किती लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे याची माहिती यात देण्यात आली आहे. १९ जानेवारी २०२१ पर्यंत देशभरात ६ लाख ३१ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कर्नाटक असून कर्नाटकात ८० हजार ६८६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तेलंगण आणि ओदिशाचा क्रमांक आहे. तर महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर असून १९ जानेवारी रोजी ही यादी प्रसिद्ध होईपर्यंत ३० हजार २४७ लोकांना ही लस देण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize thackeray sarkar over corona virus vaccination program in maharashtra less numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.