Sushma Andhare : "महाराष्ट्रातील अंधारयुग संपलंय, महिलांचे रक्षण करण्यास सरकार सक्षम;" भाजप नेत्याचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:21 AM2022-10-14T10:21:16+5:302022-10-14T10:23:11+5:30
माझ्या जीवाला धोका, माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक देतेय असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं होतं.
मला पोलिसांकडून काही इनपुट्स आले, बाहेर पडू नका. कुणी हल्ला करू शकतं. विद्यापीठात आंदोलन करताना पोलीस माझ्या बाजूला आले. तुम्ही सुरक्षित आहात का? अशी विचारणा झाली. पोलिसांकडे काही माहिती असल्याने ते अलर्टवर आहेत असं कळालं. माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो, अशी चिंता शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली होती. यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“महिलेचे घर बुलडोझर लावून तोडणारे, महिलांवर खोटे गुन्हे घालून तुरुंगात डांबणारे सरकार गेले. महिलेला अर्वाच्य शिव्या घालणारा सत्ताधारी पक्षाचा नेता तुरुंगात आहे, त्यामुळे निश्चिंत राहा अंधारे बाई. महाराष्ट्रातील अंधारयुग संपलेले आहे. प्रत्येक महिलेचे रक्षण करण्यासाठी सरकार सक्षम आहे,”असं प्रत्युत्तर भातखळकर यांनी दिलं आहे.
कायम्हणाल्याहोत्याअंधारे ?
माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल, हल्ला होऊ शकतो. कमरेखालचे वार केले जाऊ शकतात त्यापलीकडे मला अडवण्यासाठी दुसरं काही केले जाऊ शकत नाही. मला चिंता आहे की, माझ्याकडे ५ वर्षाचं बाळ आहे. ते शिवसेनेला दत्तक देते. सगळे शिवसैनिक मामा म्हणून बाळाला सांभाळतील. उद्धव ठाकरे त्या बाळाचे कुटुंबप्रमुख असतील. आम्ही करेंगे और मरेंगे याच भावनेने लढतोय अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला.
आम्ही कुणालाही सॉफ्ट कॉर्नर देत नाही. आम्ही शांत आहोत म्हणून लढायला विसरलो असं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. माझ्या सोसायटीखाली २ कॉन्स्टेबल येऊन बसले. मला सुरक्षा द्यायचं म्हणतायेत. मी याबाबत उद्धव ठाकरेंना माहिती दिली. दिवसभर माझ्यावर तणाव होता. माणूस म्हणून भावनिक असतो. जे होईल ते होईल. बाळाची चिंता वाटली मग नंतर विचार केला त्याची जबाबदारी घ्यायला शिवसैनिक खंबीर आहेत असं त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"