... आता उरलेला पक्ष संपवण्यासाठी ब्रिगेड जवळ केलेली दिसतेय, भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 02:54 PM2022-08-27T14:54:09+5:302022-08-27T14:56:38+5:30

Sambhaji Brigade- Shivsena Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारी युती शुक्रवारी झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.

bjp leader atul bhatkhalkar targets shiv sena uddhav thackray over alliance with sambhaji brigade after congress ncp | ... आता उरलेला पक्ष संपवण्यासाठी ब्रिगेड जवळ केलेली दिसतेय, भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

... आता उरलेला पक्ष संपवण्यासाठी ब्रिगेड जवळ केलेली दिसतेय, भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

googlenewsNext

Sambhaji Brigade- Shivsena Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठी घडामोड दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. दरम्यान, यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे जोरदार टोला लगावला.

“काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा करून निम्मा पक्ष गारद केला. आता उरलेला पक्ष संपवण्याठी ब्रिगेड जवळ केलेली दिसते. सगळचं संपल की मग घरी शांतपणे रोज मम्म करायचं आणि मग गाई गाई करायची,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला. खोटा इतिहास सांगण्याचे, थापा मरण्याचे कौशल्य हा उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधला समान धागा आहे, त्यामुळे ही युती नैसर्गिक असल्याचं म्हणत त्यांनी टोला लगावला.


शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी या युतीची शुक्रवारी घोषणा केली. यावेळी संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे. छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे, असं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

Web Title: bjp leader atul bhatkhalkar targets shiv sena uddhav thackray over alliance with sambhaji brigade after congress ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.