राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, पण...; भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 08:46 AM2021-07-17T08:46:37+5:302021-07-17T08:48:49+5:30
राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. (BJP-MNS alliance)
नाशिक - सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी थेट भाष्य केले आहे. “राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असेही ते म्हणाले. (BJP leader Chandrakant patil on BJP MNS alliance in future)
राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, पण...; भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं भाष्य#Chandrakantpatil#BJPMNShttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/YRJlwDkubO
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2021
रात्री कोणाला अटक झाली तर...; चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण
'ते' भाजपसोबत येतील असे वाटत नाही -
शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो, तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनकल्यानासाठी आंदोलने करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते, वेगळ्या विचारांच सरकार चालते. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या
राष्ट्रवादी नव्हे, अन्यायाविरोधात आक्रमक -
ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात भाष्य करताना पाटील म्हणाले, “ईडी ही एक केंद्रिय स्वायत्त संस्था आहे. यामुळे त्यावर काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी नव्हे, तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत. राठोड प्रकरण आणि कारखान्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आक्रमक आहोत. आम्ही महाविकास आघाडीतील कुण्याही एका ठराविक पक्षाविरोधात नाही. ”
पंकजा मुंडे नाराज नाहीत त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत -
पंकजा मुंडेंसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, केवळ पंकजा यांच्या कारखान्यासंदर्भातच कारवाई केली नाही. इतरही अनेक कारखान्यांवर कारवाई झाली आहे. पंकजा मुंडे नाराज नाहीत, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते स्वाभाविक आहे. पण पंकजा यांनी त्यांना समजावले आहे. मात्र, याचा आणि त्यांच्या कारखान्याला आलेल्या नोटिशीचा काहीही संबंध नाही.
पंकजा मुंडे नाराज नाहीत त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत - चंद्रकांत पाटील#chandrakantpatil#Pankajamundehttps://t.co/454ssjNWyxpic.twitter.com/vo05CKZC8t
— Lokmat (@MiLOKMAT) July 17, 2021