"मविआ सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करा", भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:10 PM2022-07-08T13:10:53+5:302022-07-08T13:17:57+5:30

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महाविकास आघाडी नेत्याने आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे.

bjp leader chandrashekhar bawankule demand to cancelled ward formation in local bodies | "मविआ सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करा", भाजपची मागणी

"मविआ सरकारने केलेली स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करा", भाजपची मागणी

googlenewsNext

मुंबई : भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना (Ward Formation) रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महाविकास आघाडी नेत्याने आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना झाल्या, त्यात अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून घेतल्या, त्यावर हजारो हरकती आल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येणार याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून, त्या तपासून पुन्हा रचना कराव्यात, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले सर्व निर्णय रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा धडाका लावला आहे. त्यात आता प्रभाग रचना रद्द करण्याची मोठी मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या मागणीनंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सत्ता स्थापनेपूर्वीच इतकी घाई कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी योग्य असल्याचे मत भाजपचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी व्यक्त केले आहे.

Read in English

Web Title: bjp leader chandrashekhar bawankule demand to cancelled ward formation in local bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.