Mansukh Hiren: मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना? चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारला विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 02:05 PM2021-03-06T14:05:43+5:302021-03-06T14:08:05+5:30
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडला. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेशा उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारला विचारणा केली आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडला. यानंतर मोठी खळबळ उडाली. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युमुळे ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेशा उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारला काही प्रश्न उपस्थित करत थेट विचारणा केली आहे. यासंदर्भातील एक ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. (bjp leader chitra wagh demands for fair inquiry of mansukh hiren death case)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदल परिसरात आढळून आला होता. या प्रकरणी मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू होती. चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली असून, विरोधकांकडून अनेक शंका या प्रकरणी उपस्थित केल्या जात आहेत. सचिन वाझे यांच्या संदर्भातही अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहे. यातच चित्रा वाघ यांनी ट्विट करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना, अशी विचारणा केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन...
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य.....
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी.......
सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना...?
काय म्हणतात चित्रा वाघ?
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन... प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य... आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी... सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून विचारला आहे.
मनसेच्या 'त्या' आरोपावर बोलणं संजय राऊतांनी टाळलं; वाझे-शिवसेना कनेक्शन अडचणीचं ठरणार?
संजय राऊत यांनी बोलणे टाळले
या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी यासंदर्भात बोलणे टाळले. ''याबद्दल मी बोलणे योग्य ठरणार नाही'', असे संजय राऊत म्हणाले. मनसुख हिरेन प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर येईल, तितके सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य असेल. निरपराध व्यक्तीच्या मृत्यूचे विरोधकांनी भांडवल करू नये, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केले.
सचिन वाझे यांच्यामुळे संशय अधिक बळावतोय
सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली जावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी यापूर्वीच सरकारकडे केली आहे.