'मी काय आहे अन काय नाही, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा', चित्रा वाघ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यावर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 12:28 PM2021-09-06T12:28:09+5:302021-09-06T14:32:29+5:30
Chitra Wagh reply to Mahebub Shaikh: चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई: राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना 'लाचखोर नवऱ्याची बायको', असा चित्रा उल्लेख केला होता. आता महेबूब शेख यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वाघ आहे वाघ…, कशी आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा', अशा शब्दात त्यांनी पलटवार केला.
वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काल नगरमध्ये भाषणादरम्यान चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. 'चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली होती.
https://t.co/FFf7Vcy7mu
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना थेट इशारा.#GopichandPadalkar#vijayvadettiwar
कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
शेख यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं. 'सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले, आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. मी काय आहे अन काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या,' अशा शब्दात चित्रा वाघ यांनी महेबूब शेख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ यांचं ट्विट :
वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत 🤣😂
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 6, 2021
कारण
मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून
सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू
मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या
वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही
बाप बदलणारे आम्ही नाही
यानंतर महेबूब शेख यांनी फेसबूकवरुन चित्रा वाघ यांच्या या टीकेला सडेतोर उत्तर दिलं. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ते म्हणाले,आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॅाग बाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कार्यवाही झाली तेव्हा सरकार कुणाच होत ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कार्यवाही केली होती याच उत्तर द्या. जस आम्ही म्हणतो की आमची नार्को करा, तस म्हणा नवर्याची पण नार्को करा… आम्ही बाप बदलणाऱ्याच्या बापालाही भित नाही, असं शेख म्हणाले.