"सभागृहातूनच काय, नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 05:31 PM2020-06-21T17:31:17+5:302020-06-21T17:50:30+5:30
तुकाराम मुढेंच्या या विधानावर भाजपाचे नेते दयाशंकर तिवारी ''सभागृहातूनच काय नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा'', असं प्रत्युत्तर दिले.
महापालिकेत तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यापासून नगरसेवक व पदाधिकारी यांना भेट देत नाही, विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्यावरून वाद सुरू आहे. त्यात शनिवारी सर्वसाधारण सभेत आयुक्त लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचे हनन करीत असून हुकूशमशाही कारभार करीत असल्याचा आरोप करीत सत्ताधाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. यामुळे आयुक्त महापौरांची परवानगी न घेता सभागृहातून रागारागाने निघून गेल्याची घटना शनिवारी घडली.
कोरानाच्या संकटात नागपूर शहरातील कंटेंनमेंट झोनमधील सवलती आणि क्वारंटाईन केंद्रातील सोयींवरून गेल्या काही महिन्यापासून महापौर विरोधात भाजपा आणि काँग्रेस असा वाद सुरु आहे. सभागृहात पाईंट ऑफ इंफोरमेशनच्या अंतर्गत नगरसेवकांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्याचवेळी भाजपाचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी हे आवाज चढवून सभेत आयुक्तांसोबत बोलू लागले.
भाजपाचे नगरसेवक जर अशाच अविर्भावात बोलणार असतील, तर मी सभेतून निघून जाईन, असे तुकाराम मुंढे यांनी ठणकावले. तुकाराम मुढेंच्या या विधानावर दयाशंकर तिवारी ''सभागृहातूनच काय नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा'', असं प्रत्युत्तर दिले.
एकीकडे भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक तुकाराम मुंढे यांचा जाहिर अपमान करित असतांना त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. शिवाय तुकाराम मुंढे यांनी गेल्या चार महिन्यात केलेली कामे पाहून नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.
सन्मान होत नसलेल्या सभागृहात येणार नाही- तुकाराम मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेल्याने महापौरांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले. दरम्यान अपर आयुक्त राम जोशी यांनी मुंढे यांच्याशी संपर्क साधला . परंतु ‘ज्या सभागृहात आयुक्तांचा मान राखला जात नाही. तेथे यायचे नाही’ असे आयुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती सभागृहात राम जोशी यांनी दिली.
आयुक्तांनी सभागृहात यावे- महापौर
पदाधिकारी, विरोधीपक्ष नेते व नगरसेवक यांनी आयुक्तांशी समन्वय ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ३-३ तास कक्षापुढे उभे ठेवतात. सभागृहात आयुक्तांच्या वागणुकीवर रोष व्यक्त करण्यात आला. असे असूनही मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे. जनतेशी संबंधित मुद्दे निकाली काढावे. असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
चीन, नेपाळसह आता अमेरिका देणार भारताला झटका?; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार?; भारताच्या आक्रमक भूमिकेवरुन चीननं दिलं मोठं आव्हान
'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध
कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार