Maharashtra Political Crisis: ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 09:52 AM2022-08-07T09:52:48+5:302022-08-07T09:53:19+5:30

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, हे सर्वश्रुत असले तरी, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. जाणून घ्या...

bjp leader devendra fadnavis is deputy chief minister of uttar pradesh not of maharashtra as per google search | Maharashtra Political Crisis: ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Political Crisis: ऐकावं ते नवलंच; देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री! चर्चांना उधाण, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून ऐतिहासिक बंडखोरी करत भाजपच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत नवे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राजकीय वर्तुळाला मोठा धक्का दिला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नाही, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर चांगलाच ऊत आला आहे. नेमके असे काय घडले, ते जाणून घेऊया...

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करत आपण मंत्रिमंडळाचा भाग नसू, असे जाहीर केले होते. मात्र, अवघ्या काही मिनिटांत भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश आले. पक्षादेश मानून इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता मात्र, गुगलवर सर्च केल्यास देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दाखवले जात आहे. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

गुगल म्हणतंय देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत हे संपूर्ण देशाला माहिती आहे. मात्र, गुगलवर काही वेगळेच दिसत आहे. गुगलवर देवेंद्र फडणवीस याचे नाव टाकून सर्च केल्यावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री अशी माहिती समोर येते. गुगलकडून काहीतरी चूक झाल्याने हा प्रकार घडला असावा, असे सांगितले जात आहे. मात्र, या चुकीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. ३० जून रोजी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून अडीच वर्षे काम केले. ठाकरे सरकारला अनेक मुद्द्यांवरून घेरले. विरोधी पक्षनेते होण्यापूर्वी फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. ३१ ऑक्टोबर २०१४ ते १२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत फडणवीसांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची तयारी केली असताना २३ नोव्हेंबरला फडणवीस यांनी अजित पवारांसोबत पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राजकीय वर्तुळाला प्रचंड मोठा झटका दिला. शरद पवारांनी सुत्रे फिरल्याने हे सरकार अल्पकाळ टिकले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांनंतर कोसळले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नववे उपमुख्यमंत्री आहेत.
 

Web Title: bjp leader devendra fadnavis is deputy chief minister of uttar pradesh not of maharashtra as per google search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.