Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:56 PM2021-03-09T17:56:06+5:302021-03-09T17:58:53+5:30

Maharashtra Vidhan Sabha: प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance | Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीकामुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहत नसल्याबाबत फडणवीसांचा थेट सवालमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. (Mansukh Hiren Death Case)  या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा दावा करत वाझे यांना तत्काळ निलंबित करण्या यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या एकूणच प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हटवायला पाहिजे, असे म्हणाले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अचानक बदलले, असा दावा फडणवीसांनी केला. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'या' ५ मुद्द्यांचे अद्यापही कोडे; ATS चे धक्कादायक खुलासे 

मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत 

सभागृहातील वातावरण गंभीर होतं, तेव्हा मुख्यमंत्री येतात. सभागृह शांत करतात. अध्यक्षांसोबत बैठका करतात. मात्र, विधीमंडळात उपस्थित असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात आले नाहीत, अध्यक्षांकडेही आले नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर का बदललं, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम

मनसुख हिरेन प्रकरणात ज्यांच्यावर संशयाची सूई त्यांच्याकडेच तपासाची सूत्र होती, असे म्हणत अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम आहेत. काय शिजलंय हे बाहेर येऊ नये, म्हणूनच कारवाई होत नाहीए, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करून घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 

Web Title: bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.