राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:27 PM2021-03-21T15:27:51+5:302021-03-21T15:30:54+5:30

Param Bir Singh Letter: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

bjp leader devendra fadnavis supports to raj thackeray demands on param bir singh letter | राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी दर्शवला राज ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबादेवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवादअनिल देशमुख यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून आता आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा दिला. राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (bjp leader devendra fadnavis supports to raj thackeray demands on param bir singh letter)

सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि नंतर चौकशी करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल? मनसेची विचारणा

राज ठाकरे यांची मागणी योग्यच

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन यावर भूमिका स्पष्ट केली. दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच आहे, असे सांगत फडणवीस यांनी पाठिंबा दर्शवला.

हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही

अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे आंदोलन थांबणार नाही, असे स्पष्ट करत गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची प्रकरणाची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक तसेच गंभीर आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली असून, विरोधक अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: bjp leader devendra fadnavis supports to raj thackeray demands on param bir singh letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.