'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 11:59 AM2020-08-14T11:59:04+5:302020-08-14T12:05:03+5:30

सरकारकडून जिम सुरू करण्याबाबत निर्णय अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. 

bjp leader devendra fadnavis writes to cm uddhav thackeray over reopen gyms | 'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

Next

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र आता नियम व अटींसह अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिम व्यवसायही चालू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिम चालक आणि मालकांनी केली आहे. मात्र सरकारकडून जिम सुरू करण्याबाबत निर्णय अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी जिम तत्काळ सुरू करण्यात याव्यात आणि हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करून अर्थकारणाला चालना देण्यासाठी त्या-त्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत ती क्षेत्रं खुली करायला हवी अशी मागणी केली आहे. तसेच आज राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 

'कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही, तर त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील, याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे. आज राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा विचार त्यामागे असला तरी राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचारही व्हायला हवा' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

'कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकली आहे. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासविण्याचा प्रयत्न झाला. संख्यावृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झाली आहे. महाराष्ट्र हा देश असता तर जगात सहाव्या क्रमांकावर असता. सर्वच क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने आज खरेतर ‘अनलॉक’च्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसून येत नाही. केश कर्तनालये ही अन्य राज्यांमध्ये लवकर उघडण्यात आली, महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जिम सुरू करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. यासंदर्भात होणार्‍या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे.'

'कोरोना प्रतिबंधक उपाय करीत आपल्याला आता हळूहळू सर्व बाबी खुल्या कराव्याच लागतील. त्याशिवाय पर्याय नाही. फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही. एकतर सरकार स्वत:हून प्रत्येक क्षेत्राला खुले करण्यासाठी काही अभ्यासपूर्ण शिफारसी करायला तयार नाही. त्यात ते-ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार, याबाबतचा तपशील सरकारला सादर करून ती क्षेत्र खुली करण्याची विनंती करीत आहेत. असे असताना सुद्धा सरकार पातळीवर कोणतेही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही, ही खरोखरच फारच दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील जिमचालकांनी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय स्वत:च सुचविले आहेत. यात सरकारला आणखी काही भर घायलाची असेल तर तीही करता येईल. पण, राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे' असं देखील फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; चिंता वाढवणारी आकडेवारी

"मी काय केलं होतं?, माझ्या घरावर का हल्ला केला?, माझं घर का पेटवलंत?"

Video - पावसाचे थैमान! ....अन् साचलेल्या पाण्यात अडकली रुग्णवाहिका

Video - कडक सॅल्यूट! पीपीई किट काढताना अशी होते कोरोना योद्ध्यांची अवस्था, वाहतात घामाच्या धारा

CoronaVirus News : काय सांगता? कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी संशोधक पोहोचले वटवाघुळाच्या गुहेत

15 ऑगस्ट! पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडून मागितली 'ही' गोष्ट, म्हणाले...

'"पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल

Read in English

Web Title: bjp leader devendra fadnavis writes to cm uddhav thackeray over reopen gyms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.