Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:13 PM2022-07-15T15:13:26+5:302022-07-15T15:14:23+5:30

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

BJP leader Girish Mahajan statement on Ranjitsinh Disale Guruji's resignation | Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

Next

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले (ranjitsinh disale) यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. डिसले गुरुजींच्या राजीनाम्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून, राजकारणामुळे डिसले गुरुजींवर ही वेळ आल्याचे बोलला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) लक्ष घालणार असल्याची माहिती समोर येते आहे.

फडणवीस आणि डिसलेंची भेट
भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रणजितसिंह डिसले यांची फोनवरुन चर्चा झाली आहे. डिसले गुरुजींनी चांगले काम केले, त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली. डिसले गुरुजींच्या संदर्भात मी देवेंद्र फडणवीसांसोबत बोललो आहे. डिसले गुरुजी यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत. उद्या फडणवीस यांची डिसले गुरुजी भेट घेणार आहेत, त्यानंतर देवेंद्र फडणवीस याबाबत सर्व माहिती घेतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

'आम्ही मार्ग काढू'
ते पुढे म्हणाले की, 'एवढा मोठा पुसस्कार मिळालेल्या माणसाचा गाजावाजा सगळ्या जगभर झाला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि निघून जावे हे योग्य होणार नाही. आता सरकार आमचे आले आहे, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितले. मला खात्री आहे की फडणवीस हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील,' असंही ते म्हणाले.

Web Title: BJP leader Girish Mahajan statement on Ranjitsinh Disale Guruji's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.