"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 04:04 PM2023-07-15T16:04:20+5:302023-07-15T16:04:51+5:30
रोहित पवारांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर
BJP vs Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं आणि उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष, चिन्ह सारं काही मिळवलं. त्यांच्यानंतर वर्षभराने अजित पवार यांनीही असंच प्रकारचं बंड केलं. २ जुलैला राज्यात अस्तित्वात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली आणि वेगळंच चित्र उभं राहिलं. सुरूवातीला हे सारं शरद पवारांच्या आशीवार्दानेच सुरू असल्याचे अनेकांनी तर्कवितर्क मांडले. पण नंतर, अजित पवार गटाने थोरल्या पवारांच्या विरूद्ध दंड थोपटल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले. अशातच आता शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या घरच्या मंडळींमध्ये सुप्रिया सुळेंशिवाय नातू रोहित पवारही अग्रणी दिसतो आहे. अजित पवार गटाच्या बंडानंतर रोहित पवार सातत्याने भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटावर टीका करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या आजच्या टीकेला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी भाजपाला खोचक टोला लगावला. आपल्या ट्विटरवरून त्यांनी एक फोटो शेअर केला. "ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली…", असं त्यांनी लिहिलं. यावरून त्यांना भाजपाचे केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी सणसणीत उत्तर दिले. "खरतर नीट सुरू असलेल्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करणे, अडथळे आणणे, हे शरद पवारांचे वैशिष्टय. थोडा त्यांचा राजकीय ईतिहास जो पाहिल त्याला कळेल. किती घर फोडली, सरकार अस्थिर केली. आज हाच डाव अख्खा उलटला म्हणून हतबलतेची भाषा? पक्षाची झालेली वाताहत स्पष्ट दिसते आहे पण काय बोलणार? कोणाला बोलणार?दोष कोणाला देणार? म्हणून अवाढव्य रेल्वे इंजिन, ट्रकची चेसी वगैरे वगैरे आणि शेवटी फिरून दोषी कोण तर भाजपा... असो, #GetWellSoon", अशा शब्दांत भाजपाने पलटवार केला.
खरतर नीट सुरू असलेल्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करणे, अडथळे आणणे, हे शरद पवारांचे वैशिष्टय. थोडा त्यांचा राजकीय ईतिहास जो पाहिल त्याला कळेल. किती घर फोडली, सरकार अस्थिर केली. आज हाच डाव अख्खा उलटला म्हणून हतबलतेची भाषा?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 15, 2023
पक्षाची झालेली वाताहत स्पष्ट दिसते आहे पण काय बोलणार?… https://t.co/e4VzGPShrV
रोहित पवारांचे ट्विट-
"लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते… जसं राजकारणासाठी भाजपाने चुकीचा मार्ग निवडलाय... आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल…" असं ट्विट रोहित पवार यांचं होतं. त्याला भाजपाकडून उत्तर देण्यात आलं.