... मग आयर्न लेडीची 'आर्यन लेडी' होणारच; भाजपचा शरद पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 10:58 AM2021-10-31T10:58:29+5:302021-10-31T10:58:50+5:30
Sharad Pawar : इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना अभिवादन करताना शरद पवार यांनी त्यांचा उल्लेख आर्यन लेडी असा केला होता.
Bjp On Sharad Pawar : इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी ट्विटरद्वारे त्यांना अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख आयर्न लेडी ऐवजी आर्यन लेडी असा केला. यावरून भाजपनं शरद पवार यांना टोला लगावला. भाजप महाराष्ट्रचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
"असे पोटातले ओठावर येते पाहा. इंदिरा गांधींनी १९८० साली तुमचं सरकार बरखास्त केलं होतं. त्याचा राग मनात असणं स्वाभाविक आहे. दुसरीकडे सेलिब्रिटीपुत्र आर्यन शाहरूख खानबद्दलचा कळवळा. जणू त्याला वाचवणं हा राष्ट्रवादीचा अजेन्डाच. मग आयर्न लेडीची आर्यन लेडी होणारच," असं म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला.
@PawarSpeaks, असे पोटातले ओठावर येते पाहा. इंदिरा गांधींनी 1980 साली तुमचे सरकार बरखास्त केले होते. त्याचा राग मनात असणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे सेलिब्रिटीपुत्र आर्यन शाहरूखखानबद्दलचा कळवळा. जणू त्याला वाचवण हा राष्ट्रवादीचा अजेन्डाच. मग आयर्न लेडीची आर्यन लेडी होणारच.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 31, 2021
pic.twitter.com/dlntPEOeIJ
काय म्हटलं होतं पवार यांनी?
"गरीबी हटाओचा नारा देत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या, आपल्या कणखर नेतृत्वाने जागतिक राजकारणात भारताला सक्षम बनवणाऱ्या, भारताच्या 'आर्यन लेडी' स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!," असं ट्वीट शरद पवार यांनी केलं होतं.