Sharad Pawar : “… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 05:24 PM2023-05-06T17:24:33+5:302023-05-06T17:24:59+5:30
भाजपनं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकेचा बाण सोडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाहून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पक्षातीलच अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. त्यानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेत अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूतील लोकांची भेट घेत रिफायनरीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. या दोन्ही घटनांवरून आता भाजपनं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय.
“प्रश्नः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात साम्य काय? उत्तर- दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात. पवारांनी आधी राजीनामा दिला आणि लगेचच तो फेटाळला. उद्धव ठाकरेंनी आधी प्रकल्प मंजूर केला आणि लगेचच त्याला विरोध सुरू केला! #तळ्यात_मळ्यात!” असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला.
प्रश्नः @OfficeofUT आणि @PawarSpeaks यांच्यात साम्य काय?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 6, 2023
उत्तर- दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात.
पवारांनी आधी राजीनामा दिला आणि लगेचच तो फेटाळला, उद्धव ठाकरेंनी आधी प्रकल्प मंजूर केला आणि लगेचच त्याला विरोध सुरू केला!#तळ्यात_मळ्यात!!
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
गेल्या काही काळात चांगले प्रकल्प गुजरातला गेले. तर वाईट प्रकल्प येथे आणले जात आहेत. मात्र स्थानिकांचा विरोध असेल तर हा रिफायनरी प्रकल्प कोकणात व्हायला नको. हा प्रकल्प चांगला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रकल्प इतकाच चांगला असेल तर त्यासाठी पोलीस बळाचा वापर का केला जात आहे. सरकारकडून होत असलेली दडपशाही पाहता या प्रकल्पामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याची शंका येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.