भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 16:43 IST2020-02-16T15:54:20+5:302020-02-16T16:43:03+5:30
जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे.

भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचलेत : किरीट सोमय्या
मुंबई : उद्धव ठाकरेंना रात्र-दिवस फक्त कमळचं दिसत आहे. तर आम्हाला तुमचं सरकार पाडण्यासाठी कोणत्याच ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. कारण तुमचा एक पाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ओढत आहे, तर दुसरा पाय राहुल गांधी ओढतायत. जे सरकार स्वता:च पडणार, त्याच पाप आम्ही का घ्यावा? अशी जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. एकीकडे संजय राऊत घोषणा करतात की उद्धव ठाकरे 7 मार्चेला राम मंदिरात जाणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याचसोबत सत्तेत असलेला त्यांचा जोडीदार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा म्हणतो की, उद्धव ठाकरे रामंदिरात जाणार असेल तर आम्ही सुद्धा बाबरी मस्जिद बनवू. त्यामुळे हे शिवसेनेला पटणार आहे का ? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात २०१४ पासून महाविकास आघाडीची चर्चा सुरु असल्याचे खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितेले. तर लोकसभा निवडणुकीच्यावेळी शरद पवारांसोबत संपर्कात होतो हे संजय राऊत यांनी कबूल केलं आहे, त्यामुळे विश्वासघात कुणी केला असा प्रश्न ही यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. तर भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून 'ते' इथपर्यंत पोहचले असल्याचे सुद्धा सोमय्या म्हणाले.