भावना गवळी यांनी 22 वर्षांत केला १०० कोटींचा घोटाळा, आपल्याकडे सबळ पुरावे; किरीट सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 06:56 PM2021-08-20T18:56:20+5:302021-08-20T18:57:51+5:30

"खासदार भावना गवळी व समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत."

BJP leader Kirit Somaiya says Bhavana Gawli committed a scam of Rs 100 crore in 22 years, we have strong evidence | भावना गवळी यांनी 22 वर्षांत केला १०० कोटींचा घोटाळा, आपल्याकडे सबळ पुरावे; किरीट सोमय्यांचा दावा

भावना गवळी यांनी 22 वर्षांत केला १०० कोटींचा घोटाळा, आपल्याकडे सबळ पुरावे; किरीट सोमय्यांचा दावा

googlenewsNext

वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा घणाघाती आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. एवढेच नाही तर, घोटाळ्याचे आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यासह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते आज भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. (BJP leader Kirit Somaiya says Bhavana Gawli committed a scam of Rs 100 crore in 22 years, we have strong evidence)

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून पहाटे पाच वाजता ७ कोटींची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार (एएफआयआर क्रमांक ३८९/२०२०) तब्बल दहा महिन्यानंतर रिसोड पोलिसांत दाखल केली. मुळात एवढी मोठी रक्कम कार्यालयात ठेवण्याची कारण काय? त्यातही ही रक्कम गवळी यांच्याकडे नेमकी कोठून आली, असा सवाल त्यांनी गवळींऐवजी थेट शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून केल्या जाणाऱ्या वसूलीतून हा पैसा जमला का, असाही प्रश्न यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. 

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून दगडफेक, कारवर फेकली शाई 

याच बरोबर, ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना खासदार भावना गवळी यांनी केवळ २५ लाखाला खरेदी केला. या व्यवहारातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. त्यांच्याकडे स्टेट बॅंक ऑफ इंडियासह इतर काही बॅंकांचे ११ कोटींचे कर्ज आहे, असे सांगून आपली मालमत्ता बॅंकेने जप्त केली का? डीफॉल्टर झाल्याचे बॅंकांनी घोषित केले का? असे प्रश्न सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केले. 

यावेळी पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, तेजराव पाटील थोरात आदिंची उपस्थिती होती.

प्रताप सरनाईक यांचा किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल केला १०० कोटींचा दावा

"मुख्यमंत्री ठाकरे व पोलीस गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत" -
खासदार भावना गवळी व समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. त्याचे सबळ पुरावेदेखील आहेत. असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करित आहेत. हेच त्यामागील मुख्य कारण असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

Web Title: BJP leader Kirit Somaiya says Bhavana Gawli committed a scam of Rs 100 crore in 22 years, we have strong evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.