“… म्हणजे शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ आहेत असा आरोप स्वतः मुख्यमंत्री करत आहेत?”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:48 PM2022-06-03T12:48:52+5:302022-06-03T12:50:17+5:30
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल
राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवरून रस्सीखेच सुरु झालेली असताना महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी नेमके संजय राऊतांनी (Sanjay Raut) निवडणुकीमध्ये घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे घोडेबाजारावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरच जोरदार निशाणा साधलाय.
“राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार सुरू आहे अशी चिंता उद्धव ठाकरे व्यक्त करतायत. त्यांच्या पक्षाचे आमदार, मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ असल्याचा आरोप उद्धव ठाकरेच करतायत? बेईमान कोण आहेत, आमदार की नेते?,” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजार सुरू आहे अशी चिंता शिवसेना - उद्धव ठाकरे व्यक्त करत आहेत... म्हणजे शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ आहेत असा आरोप स्वतः मुख्यमंत्री करत आहेत?
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 3, 2022
बेईमान कोण आहे? आमदार की नेते?@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
सहा जागा आणि सात उमेदवार
राज्यसभेच्या सहा जागा आणि सात उमेदवार उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीकडे आणि भाजपाकडे जादाची मते आहेत. अपक्षांची मते देखील आहेत. परंतु असे जरी असले तरी भाजपाला महाविकास आघाडीची मते घेतल्याशिवाय किंवा आघाडीला भाजपाची मते घेतल्याशिवाय सहावा उमेदवार निवडून आणणे कठीण आहे. दोन्ही बाजूने मतांची बेगमी झाल्याचे दावे केले जात आहेत. परंतु, आजच्या बैठकीवरून कोणाच्याच हाती काही नसल्याचे दिसत आहे. अशावेळी राऊतांनी भाजपाचे नाव न घेता घोडेबाजाराचा आरोप केला आहे.