एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 08:57 AM2022-10-03T08:57:55+5:302022-10-03T08:58:46+5:30

खडसेंच्या मनात काय माहिती नाही. ४० वर्ष सगळं देऊनही खडसेंची भाजपात घुसमट होत होती आता १ वर्षात तिकडे घुसमट व्हायला लागली असं महाजनांनी सांगितले.

BJP Leader, Minister Girish Mahajan Targeted to NCP MLC Eknath Khadse | एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले..

एकनाथ खडसेंबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले..

googlenewsNext

नाशिक - देवेंद्र फडणवीसांसोबत मतभेद झाल्यानंतर एकनाथ खडसेंनीभाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने खडसेंना विधान परिषदेची संधी दिली आहे. परंतु आता आमदार एकनाथ खडसेभाजपात परतणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. खडसे अमित शाह यांच्या भेटीला दिल्लीत गेल्याचंही वृत्त आले. त्यात आता भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत मोठा दावा केला आहे. 

गिरीश महाजन म्हणाले की, नाशिकमधील एका कार्यक्रमात खडसे आमच्यासोबत होते. भाषण संपल्यानंतर जेव्हा मी, देवेंद्र फडणवीस, खडसे एकत्र होतो. तेव्हा जे असेल ते एकत्र बसून मिटवून टाकू. त्यांच्या मनात नेमकं काय मिटवायचं हे कळालं नाही. बसल्यावर काय मनात आहे माहिती नाही. त्यावेळी गडबडीत पुढे विचारायचं राहिलं. आपण यावर विचार करू असं त्यांनी सांगितले. 

तर अमित शाह यांना दिल्लीला एकनाथ खडसे भेटायला गेले असताना कार्यालयाबाहेर ३ तास बसल्याचं मला खासदार रक्षा खडसेंकडून कळालं. अमित शाह यांना भेटीची वेळ दिली नाही. भेटायला नकार दिल्याचं कळालं. खडसेंच्या मनात काय माहिती नाही. ४० वर्ष सगळं देऊनही खडसेंची भाजपात घुसमट होत होती आता १ वर्षात तिकडे घुसमट व्हायला लागली. एकनाथ खडसेंनी सबुरीने घ्यायला हवं. श्रद्धा आणि सबुरीने वागलं तर निश्चित त्या पक्षात फळ मिळेल असा टोलाही महाजनांनी खडसेंना लगावला. 

भाजपा प्रवेशाचं एकनाथ खडसेंकडून खंडन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? मोदी-शाह यांच्यासोबत विरोधक गोधडीत असल्यापासून माझे संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP Leader, Minister Girish Mahajan Targeted to NCP MLC Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.