मी सकाळी लवकर आंघोळ करून आलोय, मी तुमचं काय वाईट केलंय : अभिमन्यू पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:13 PM2022-08-23T17:13:29+5:302022-08-23T17:14:06+5:30
मंगळवारी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही या मुद्द्यावरून भाजपचे आमदार अभिमन्यू पवार तालिका अध्यक्षांवर चांगलेच संतापलेले दिसले.
मंगळवारी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही या मुद्द्यावरून भाजपचे आमदार अभिमन्यू पवार तालिका अध्यक्षांवर चांगलेच संतापलेले दिसले. नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट तालिका अध्यक्षांनाच जाब विचारला. दरम्यान, यावरून नंतर त्यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील सुनावलं.
तालिका अध्यक्षांनी कामकाजादरम्यान अभिमन्यू पवार यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी बोलताना त्यांचा संताप दिसून आला. “मला का बोलू दिलं गेलं नाही. या विषयावर बोलण्याचा माझा संबंध नाही. मी तुमचं काय वाईट केलं आहे. मला कशामुळे बोलू दिलं नाही. मला काहीतरी बोलायचं होतं म्हणून सकाळी सकाळी लवकर आंघोळ करून इथे आलो. मला बोलू का दिलं नाही हा माझा प्रश्न आहे,” असं अभिमन्यू पवार म्हणाले.
अजितपवारांनीसुनावलं
या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिमन्यू पवार यांना खडेबोल सुनावले. अभिमन्यू पवारांना विनंती आहे की त्यांनी तालिका अध्यकांना धमकावू नका. तुमच्याकडू अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला अलेल, पण वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीनं कोणाला धमकावणं योग्य नसल्याचं ते म्हणाले.