नवाब मलिक अडचणीत? भाजप नेत्याने दाखल केला 100 कोटींचा मानहानीचा खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:56 PM2021-10-31T12:56:45+5:302021-10-31T12:56:54+5:30
Mumbai Drugs Case: नवाब मलिक मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप करत आहेत.
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे(ऴऱझ) नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिली.
मोहित कंबोज यांचे ट्विट
मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, 'माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप केले. यामुळे आमची प्रतिमा खराब झाली. त्याबद्दल मी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा नुकसानीचा दावा दाखल केला आहे.'
2nd Case : Today I Have Filled Damages Suit Against मियाँ Nawab Mallik For 100 Crores in High Court Mumbai For Putting Baseless Allegations Against Me and My Family ! pic.twitter.com/6Ck7XuWXpP
— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) October 30, 2021
नवाब मलिकांचे अनेकांवर आरोप
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. आता मोहित कंबोज यांनी मलिकांवर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकल्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. या दाव्याला मलिक काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
नोटीस देऊनही मलिक थांबले नाहीत
एका वृत्तानुसार, भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना त्यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही नवाब मलिक यांनी 11 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज यांच्यावर अनेक आरोप केले.