Maharashtra Politics: “सुषमा अंधारे-राखी सावंत बहिणी, दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी, कारण...”; भाजपची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:27 PM2023-04-06T15:27:59+5:302023-04-06T15:28:34+5:30
Maharashtra News: भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले असून, सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी असल्याचा खोचक टोला लगावण्यात आला आहे.
Maharashtra Politics: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्षात भर पडली आहे. यातच ठाकरे गटाने ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयावर जनप्रक्षोभ मोर्चा काढला होता. या मोर्चात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली.
झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नी वर स्पायिंग करत होती हे तुम्हाला 7वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !!, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा भाजप नेते मोहित कंबोज यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. सुषमा अंधारे आणि राखी सावंत बहिणी असल्याचे टोला लगावत खोचक शब्दांत टीका केली.
सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी
भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, सुषमा अंधारे आणि राखी सावंत दोघी बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दुसरी बहीण महाराष्ट्राच्या चित्रपटांमध्ये… दोघी एकमेकींच्या प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यात कोण जास्त खळबळ माजवते याची रोज स्पर्धा सुरू असते, असे खोचक ट्विट मोहित कंबोज यांनी केले.
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
— Mohit Kamboj Bharatiya - #IAmSavarkar (@mohitbharatiya_) April 6, 2023
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा
सनसनी कौन मचाई गा !
दरम्यान, राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू ? उद्धव मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतुस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"