Mumbai Drug Case: ...मग गेल्या महिनाभरापासून झोपला होता काय? आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:37 PM2021-11-07T13:37:40+5:302021-11-07T13:43:43+5:30

Mohit Kamboj Vs Nawab Malik: Aryan Khanचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

BJP leader Mohit Kamboj's rejected all allegations made by Nawab malik against him | Mumbai Drug Case: ...मग गेल्या महिनाभरापासून झोपला होता काय? आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल

Mumbai Drug Case: ...मग गेल्या महिनाभरापासून झोपला होता काय? आरोप फेटाळत मोहित कंबोज यांचा नवाब मलिकांना सवाल

googlenewsNext

मुंबई - मुंबई ड्र्ग्स प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणामध्ये नवाब मलिक आणि भाजपा नेते मोहित कंबोज हे आमने-सामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. दरम्यान, आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केल्यानंतर मोहित कंबोज यांनीही मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले असून, या प्रकरणात काँग्रेसच्या मंत्र्याचे नाव घेतल्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच ड्रग्स पेडलर्सबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांच्या असलेल्या संबधांबाबत खुलासा करण्याचे आव्हानही कंबोज यांनी मलिक यांना दिले आहे. तसेच या प्रकरणात मी मास्टरमाईंड असल्याचे नवाब मलिक म्हणताहेत, मग ते गेल्या एका महिन्यापासून झोपले होते काय? असा प्रश्न मोहित कंबोज यांनी विचारला आहे.

नवाब मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मोहित कंबोज यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, सुरुवातीला मी राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांचे आभार मानतो. गेल्या काही दिवसांमध्ये मी क्रूझ पार्टी प्रकरणाबाबत ज्या गोष्टी मांडल्या, तसेच काल जे काही गौप्यस्फोट केले होते. ते नवाब मलिक यांनी मान्य केले आहेत. आज देशाने आणि महाराष्ट्रातील जनतेने सत्य ऐकले आहे.

काही दिवसांपूर्वी मलिक यांनी एका एका दाढीवाल्याचा उल्लेख केला होता. तेव्हा तो दाढीवाला कोण आहे, हे सांगण्याचे आणि त्याचे कुठल्या मंत्र्याशी संबंध आहेत, हे जाहीर करण्याचे आव्हान मलिक यांना दिले होते. अखेर आज नवाब मलिक यांनी अस्लम शेख यांचे नाव घेतले आहे. हा दाढीवाला अस्लम शेख यांना क्रूझवरील पार्टीसाठी येण्याचे वारंवार निमंत्रण देत होता, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 
आता मी मलिक यांना विचारतो की, हा दाढीवाला आणि मंत्र्यामध्ये असी कुठली आघाडी होती, ज्यामुळे नवाब मलिक यांनी आरोप केलेला हा ड्रग पेडलर, ड्रग माफिया असलेला कासिफ खान एका मंत्र्याला अस्लम शेख यांना पार्टीसाठी बोलवत होता. यावरून कासिफ खान आणि अस्लम शेख यांच्यात संबंध असल्याचा माझा आरोप सिद्ध होतो. तसेच त्याचे  सत्य नवाब मलिक यांनीच समोर आणले आहे, असे कंबोज म्हणाले.

माझा दुसरा आरोप होता की, या पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या मुलांचा सहभाग होता. त्यांचे ड्रग्स पेडलर्ससोबत संबंध होते. कासिफ खानसोबत त्यांचे संबंध होते. एका ड्रग पेडलरसोबत राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांच्या मुलांच्या असलेल्या संबंधांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे आव्हानही मोहित कंबोज यांनी दिले.

तसेच सुनील पाटील यांच्यासोबत नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप मी काल केला होता. त्याबाबतचे पूर्ण सत्य मलिक यांनी आज सांगितले आहे. सुनील पाटीलचा फोन आल्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र त्यांनी पूर्ण माहिती दिलेली नाही. हा सुनील पाटील जेव्हा हॉटेलमध्ये शराब, शबाब आणि कबाबची पार्टी करायचा तेव्हा तिथे चौथा नबाब असायचा. तसेच सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत, असा दावाही मोहित कंबोज यांनी केला.

आता नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे ठरू लागल्यावर या प्रकरणात मीच मास्टरमाईंड असल्याचा आरोत ते करत आहेत. मात्र गेल्या एका महिन्यापासून ते झोपले होते काय? या संपूर्ण प्रकरणातून त्यांचा थयथयाट दिसत आहे. कासिफ खानशी काय संबंध आहेत, याचं उत्तर अस्लम शेख यांना द्यावं लागेल, असेही मोहित कंबोज यावेळी म्हणाले. 

Web Title: BJP leader Mohit Kamboj's rejected all allegations made by Nawab malik against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.