“बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:13 PM2022-06-23T22:13:01+5:302022-06-23T22:13:07+5:30

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल, असं पवार यांनी केलं होतं वक्तव्य.

bjp leader narayan rane targets ncp leader sharad pawar maharashtra political crisis eknath shinde shiv sena uddhav thackeray | “बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”

“बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”

googlenewsNext

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला वाटत नाही की त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथे येऊन मार्गदर्शन करतील. तसेच तिथे गेलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना दिला. दरम्यान, यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल,” असं नारायण राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.



“संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही,” असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीकेचा बाण सोडला.

Web Title: bjp leader narayan rane targets ncp leader sharad pawar maharashtra political crisis eknath shinde shiv sena uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.