"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

By बाळकृष्ण परब | Published: November 16, 2020 09:26 AM2020-11-16T09:26:03+5:302020-11-16T09:33:11+5:30

Beed acid attack incident : बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?

BJP leader Nilesh Rane Criticize Thackeray Government For Beed acid attack incident | "हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

"हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?”

googlenewsNext
ठळक मुद्देबीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात शनिवारी दुपारी एक २० वर्षीय तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होतीही २० वर्षीय तरुणी विवाहित होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुणे येथे प्रियकरासोबत राहत होती१४ रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नेकनूर-केज रोडलगत आरोपी तरुणाने दुचाकी थांबवली आणि त्याठिकाणी तिच्यावर अ‍ॅसीड हल्ला केला

मुंबई - बीडमध्ये एका तरुणीवर सुरुवातीला अ‍ॅसिड हल्ला करून नंतर तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान, या धक्कादायक प्रकारावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत सरकारने टीका केली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, बीडमध्ये एका २० वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? राज्यात महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.



एका २० वर्षीय विवाहित तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता.बीड) येथे घडली होती. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरून काल सकाळी बीड जिल्हा रूग्णालयात तिचा मृत्यू झाला. माणूसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट परिसरात शनिवारी दुपारी एक २० वर्षीय तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील २० वर्षीय तरुणी विवाहित होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुणे येथे प्रियकरासोबत राहत होती. १३ नोव्हेंबर रोजी दोघेही पुण्याहून दुचाकीवरून गावी निघाले होते. १४ रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास नेकनूर-केज रोडलगत आरोपी तरुणाने दुचाकी थांबवली आणि तिला रस्त्याच्या बाजूला नेले. त्याठिकाणी तिच्यावर अ‍ॅसीड हल्ला केला. त्यानंतर पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. तरुणीला अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून तो फरार झाला.

पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ती तरुणी जाग्यावरच तडफडत होती. रोडवरून जाणाऱ्या वाहनधारकांना तिचा आवाज आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जावून पाहिले असता पीडित तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने तिला नेकनूर येथील कुटीर रूग्णालयातून पुन्हा रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शनिवारी रात्रभर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 48 टक्के भाजल्याने तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून, आज सकाळी जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. 

 

Web Title: BJP leader Nilesh Rane Criticize Thackeray Government For Beed acid attack incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.