"भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 08:28 PM2021-03-22T20:28:11+5:302021-03-22T20:32:03+5:30

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे.

bjp leader nilesh rane slams bhaskar jadhav over various issues | "भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते"

"भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते"

googlenewsNext
ठळक मुद्देनिलेश राणे यांची भास्कर जाधव यांच्यावर टीकाराष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत उडी मारली - राणेमुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका - राणे

मुंबई : राज्यातील एकूणच घडामोडींवरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप (BJP) आणि अन्य पक्ष ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजपचे महाराष्ट्र सचिव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केला आहे. भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. (bjp leader nilesh rane slams bhaskar jadhav over various issues)

भास्कर जाधव यांच्या चिरंजीवांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. भास्कर जाधव यांनी शिवबंधन बांधले असले, तरी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी चिरंजीवांना संधी देण्यात येत आहे, असे सांगितले जात आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजप आणि नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. या पलटवाराला निलेश राणे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

काय म्हणाले निलेश राणे?

भास्कर जाधव विसरले ते राष्ट्रवादीत वाढले, सगळी पदे मिळून सुद्धा परत राष्ट्रवादीतून निवडून यायची खात्री नव्हती म्हणून २ वर्षा पूर्वी शिवसेनेत उडी मारली. आज मुलाला जि. प. अध्यक्ष केला म्हणून शिवसेनेचा पुळका आला नाही तर चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होता, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे. 

रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती; परमबीर सिंगांचा पुन्हा मोठा दावा

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांना पचत नाहीए

काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्हीही देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका, असा टोला भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला. 

महाराष्ट्र सरकार वाझे गॅंगला वाचवण्याचं काम करतंय; राम कदम यांचा घणाघाती आरोप 

मुख्यमंत्री झाला नाही, हीच भाजपला सल

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. राज्यात भाजप सरकार आले नाही, तर २०२४ मध्ये केंद्रात भाजप सरकार येणार नाही, याची भाजपला कल्पना आहे. हीच भाजपची दुखरी नस असून, याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

Web Title: bjp leader nilesh rane slams bhaskar jadhav over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.