Nilesh Rane: नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात, निलेश राणेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:15 PM2022-04-29T14:15:52+5:302022-04-29T14:16:30+5:30
Nilesh Rane: भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मंत्रिमंडळ निर्णयाच्या फोटोवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई: भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या एका निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तुरुंगात आहेत, तरीदेखील त्यांच्याकडून मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झाल्याने निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काल म्हणजेच 28 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे. दरम्यान, निलेश राणे यांनी या निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. या फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नलाब मलिकांचा फोटो आहे.
काय शोकांतिका आहे... हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तका सोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहे तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय. pic.twitter.com/1G6M9c2AQK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 29, 2022
निले राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक याचा निर्णय जाहीर केलाय," अशी पोस्ट शेअर केली आहे.