Sachin Vaze: “शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:55 PM2021-03-29T16:55:19+5:302021-03-29T16:58:38+5:30
Sachin Vaze: भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे.
मुंबई : मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. (bjp leader prasad lad criticized shiv sena over sachin vaze case)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद झालेला मृत्यू या एकूणच प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. या तपासात NIA च्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सचिन वाझे यांनी मिठी नदीत काही पुरावे नष्ट करण्यासाठी टाकलेल्या काम्प्युटरचा सीपीयू, हार्डडिस्क, खोट्या नंबरप्लेटसह अनेक वस्तू सापडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत
म्हणून मिठी नदी साफ केलेली नाही
इतके दिवस मिठी नदी स्वच्छ का केली जात नव्हती, याचा खुलासा आता झाला आहे. मिठी नदीत सचिन वाझे यांनी फेकलेले डीवीआर, सीपीयू सापडल्यानंतर शिवसेनेचे पाप जनतेसमोर उघड करू. शिवसेनेने आपले पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नव्हती. यानंतर आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील
जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला
दरम्यान, मिठी नदीत सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने NIAकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. सुमारे चार तास ही शोधमोहीम सुरू होती. मिठी नदीतून NIA ला एक लॅपटॉप, दोन कम्प्युटर, एक डीव्हीआर, एक हार्डडिस्क, एक प्रिंटर, दोन नंबर प्लेट्स सापडल्याचे सांगितले जात आहे.