पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 02:17 PM2021-03-02T14:17:27+5:302021-03-02T14:20:35+5:30
पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता यानंतर रेणू शर्मा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता हळूहळू जोर धरू लागली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता यानंतर रेणू शर्मा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आता हळूहळू जोर धरू लागली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (bjp leader pravin darekar demands that dhananjay munde should resign)
पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. पंकजा मुंडे यांच्या या मागणीला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचा सूतोवाच प्रवीण दरेकर यांनी यावेळी बोलताना केला. विधान भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मोदींचा हिंदूंवर विश्वास नाही, ख्रिश्चन नर्सकडून कोरोना लस घेतली: प्रकाश आंबेडकर
शिवसेनेत अंतर्गत वादळ
संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राजीनामा दिला. मात्र, रेणू शर्मा प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला नाही. धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय देण्यात आल्याने शिवसेनेत अंतर्गत वादळ सुरू आहे. आपल्याही नेत्याला मंत्री म्हणून संरक्षण द्यावे, अशी शिवसेनेची भूमिका होती. मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेची बाजू कमकुवत असल्याचे दिसत आहे. आपल्याला दिला तोच न्याय, त्यांनाही हवा असेल, असे प्रवीण दरेकरांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडेंना संरक्षण देतेय
धनंजय मुंडेंना रक्षण देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळेच तसेच अधिवेशन चालवू देणार नाही, या इशाऱ्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. आता जर यांची नैतिकता जागी झाली असेल, तर जो न्याय संजय राठोड यांना आहे, त्याच नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी पंकजा मुंडेंची मागणी असेल तर ती बरोबर आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले.