मविआ सरकारमध्ये संवेदना नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती: प्रविण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:37 PM2021-03-03T13:37:58+5:302021-03-03T13:46:07+5:30
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतची माहिती देताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतची माहिती देताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (bjp leader pravin darekar says we will expose another maha vikas aghadi mla)
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाजी सरकारमध्ये संवेदना उरलेली नाही, सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, असा आरोप करत आघाडीच्या एका आमदाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत, असे म्हटले आहे.
राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलारांची टीका
'त्या' आमदाराची डीएनए चाचणी करावी
महाविकास आघाडीच्या एका आमदाराची डीएनए टेस्ट करण्याची न्यायालयात मागणी आहे. या आमदाराची पत्नी आणि अपत्य बाहेर आहे. या आमदाराने त्याच्या मुलाला मारहाणही केली आहे. त्यामुळे या आमदाराची चौकशी करावी आणि त्याची डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी सभागृहात करणार आहे, असे दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रवीण दरेकर यांनी आरोप केलेला हा आमदार कोण? असा सवाल केला जात आहे. हा आमदार महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा आहे? त्याचे नेमके काय प्रकरण आहे? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज्यपालांकडे राजीनामा पाठवावा
संजय राठोड यांच्या राजीम्यावरूनही प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राजीनाम्याचे केवळ नाटक सुरू आहे. या नाटकाचा हा पहिला अंक आहे की, दुसरा अंक आहे माहीत नाही, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. दरम्यान, संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत. त्यामुळेच त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे अद्याप पाठवण्यात आलेला नाही, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पंकजा मुंडेची मागणी रास्त
भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळेच तसेच अधिवेशन चालू देणार नाही, या इशाऱ्यानंतर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. आता जर यांची नैतिकता जागी झाली असेल, तर त्याच नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी रास्त आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. महाराष्ट्रातील जनता स्वागत करेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले.