गाडी फुल्ल होण्याआधी भाजपमध्ये या, अन्यथा नंतर...; सेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांना दरेकरांची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 09:09 PM2022-02-21T21:09:40+5:302022-02-21T21:23:06+5:30

ज्या शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली, त्यांची महाविकास आघाडीत फरफट; दरेकरांचं टीकास्त्र

bjp leader pravin darekar slams shiv sena give offer to party office bearers | गाडी फुल्ल होण्याआधी भाजपमध्ये या, अन्यथा नंतर...; सेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांना दरेकरांची साद

गाडी फुल्ल होण्याआधी भाजपमध्ये या, अन्यथा नंतर...; सेनेच्या 'त्या' पदाधिकाऱ्यांना दरेकरांची साद

Next

ठाणे : शिवसेनेचे शक्तीस्थान हे तळागाळातील लोक आहेत. शाखा प्रमुख ही शिवसेनेची ताकद आहे. परंतु आताच्या शिवसेनेत दम नाही म्हणून शाखाप्रमुख भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. शिवसेनेचा डोलारा हा शिवसैनिकांच्या कामामुळे उभा राहिला. परंतु सतेचा फायदा शिवसैनिकला मिळत नाही. त्यामुळे ज्या शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेना उभी राहिली, तो शाखाप्रमुख आणि उप शाखाप्रमुख नाराज असेल तर, शिवसेनेची  महाविकास आघाडीत फरफट होत आहे, असे परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे एकमेकांवर टीका करतात. पण ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकला नाही. तसेच मालमत्ता कर माफीचे गाजर दाखविला जात आहे, असे ते म्हणाले. भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना, साधे महापालिकेचे तिकीट मिळाले नाही. परंतु भाजपने मला पक्षात घेऊन विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते पद दिले. त्यामुळे गाडी फुल व्हायच्या आधी या, नंतर लटकत यावे लागले, असे ते म्हणाले. मराठी माणसाला शिवसेनेने वाऱ्यावर सोडले असून त्याचे सोयरसुतक शिवसेनेला नाही. त्यामुळे मराठी माणसाला भाजपशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

फ्लावर समजू नका, आम्ही फायर आहोत- चित्रा वाघ
ठाणे: राज्यात महिलांवर बलात्कार होत आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तर, ते निर्लज्ज उत्तर देऊन उत्तर प्रदेशाचे दाखल देतात. महाराज असते तर, सरकारचा कडेलोट केला असता, असे विधान भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी  ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. आमच्या पक्षाला  फ्लावर समजू नका आणि आम्ही फायर आहोत, असेही त्या म्हणाल्या. 

वर्तकनगर येथील भीमनगर भागात भाजप पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पडला. त्यामध्ये त्या बोलत होत्या. किसननगर आणि वर्तकनगरमधील पक्ष प्रवेश म्हणजे ठाण्यातील मिशन कमळ ला मिळालेला शुभ संकेत आहे. तसेच ठाण्यात भाजप फुटणार आशा वावड्या उठविणाऱ्यांना किसनगरचा पक्ष प्रवेश ही एक चपराक आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. 

ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेला पाणी आणि गटार समस्याही सोडविता आलेल्या नाहीत. दोन मंत्री असूनही परिवहन सेवा सक्षम नाही. एकहाती सत्ता येणार असे म्हणणाऱ्यांना खिंडार पडल्याशी राहणार नाही आणि त्यांचे एकहाती सत्तेचे दिवास्वप्न राहील, असेही ते म्हणाल्या. ठाण्यात महिला अधिकाऱ्याची बोटे छाटली. डोंबिवली बलात्कार प्रकरण यामुळे कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत. याबाबत जे बोलतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहे. किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही गप्प बसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर योजनेचे बॅनर लावून ठाणेकरांना फसवण्याचे काम सुरू असून त्याचा जाब विचार असेही त्यांनी सांगितले.

Web Title: bjp leader pravin darekar slams shiv sena give offer to party office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.