Pravin Darekar Coronavirus Positive : भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:17 PM2022-01-05T12:17:02+5:302022-01-05T12:17:34+5:30

Pravin Darekar Coronavirus : यापूर्वीही राज्यातील काही नेत्यांना झाली होती कोरोनाची लागण.

bjp leader pravin darekar tested coronavirus positive maharashtra | Pravin Darekar Coronavirus Positive : भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

Pravin Darekar Coronavirus Positive : भाजप नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण

googlenewsNext

Pravin Darekar Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. 

"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी," असं दरेकर यांनी म्हटलंय.

 
यापूर्वी काही नेत्यांना कोरोनाची लागण
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena Mp Arvind Sawant), राजन विचारे (Rajan Vichare) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची (Tested Coronavirus Positive) माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी केलं होतं.

Web Title: bjp leader pravin darekar tested coronavirus positive maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.