छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 12:45 PM2024-07-07T12:45:07+5:302024-07-07T12:48:23+5:30

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत.

bjp leader raju shinde will join the shiv sena thackeray group, chhatrapati sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजू शिंदे यांनी त्यांच्या भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू शिंदे यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. 

गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनी राजू शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी सुरू केली. तसेच, राजू शिंदे यांच्याबाबत भाजपकडून तब्बल आठ बैठका झाल्या, पण तरीही राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते.

राजू शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे की, "आता माघार नाही..! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये  प्रवेश करत आहोत. आपण जी मला साथ दिली यापुढेही देताल हीच इच्छा." दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स छत्रपती संभाजीनगर शहरात लागले आहेत. त्यावर राजू शिंदे यांचा उल्लेख शिवसेना ठाकरे गटाचे नेते असा करण्यात आला आहे. राजू शिंदे यांच्या राजकीय भूमिकेचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

सावे, शिरसाटांना बसणार धक्का?
राजू शिंदे यांनी भाजपला रामराम केल्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना धक्का बसला आहे. पूर्व मधील निवडणूक ही अटीतटीची होत असते. तसेच, पश्चिममध्ये आता शिरसाट यांना त्यांच्याच जुन्या पक्षाकडून तगडा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते. 

ठाकरे गटामधील इच्छुकांमध्ये नाराजी
ठाकरे गटामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन कांबळे आणि लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा इच्छुक आहेत. तसेच, माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. यामुळे राजू शिंदे हे उद्धव ठाकरे येत असल्याने इच्छुकामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

Web Title: bjp leader raju shinde will join the shiv sena thackeray group, chhatrapati sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.