मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजप नेत्याची मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 09:46 AM2020-01-15T09:46:32+5:302020-01-15T10:33:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे हळवणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते.
मुंबई - 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता भाजपवासी झालेले छत्रपती उदयनराजे यांच्यासह संभाजी राजे, शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हे शांत झालं अस वाटत असताना भाजपच्या माजी आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाजारांचा सन्मान असल्याची मुक्तफळे भाजप नेत्यांने उधळली आहेत.
'नरेंद्र मोदी हेच शिवाजी' असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे नाही. या पुस्तकाच्या लेखकाचे आपण समर्थन करतो. या तुलनेत काहीही गैर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असल्याचे हळवणकर यांनी म्हटले आहे. भाजपच्या बैठकीत ते बोलत होते.
हळवणकरांनी महाराजांनी केलेले काम आणि पंतप्रधान मोदी करत असलेल्या कामकाजात साधार्म्य असल्याचा फुटकळ दावा केला. मोदी राबवत असलेल्या योजनांचे दाखले देत आपल्या वक्तव्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न हळवणकर यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा नवीन वाद उफळण्याची शक्यता आहे.