कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 11:26 AM2021-01-03T11:26:51+5:302021-01-03T11:36:28+5:30

मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सरकार म्हणून शिफारस करावी, आम्ही देखील मदत करू; दरेकरांचं वक्तव्य

bjp leader slams shiv sena over name change of aurangabad to sambhajinagar | कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

कोणतीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट, मग राज्य सरकार का चालवता?; औरंगाबाद नामांतरावरून दरेकरांची टीका

Next
ठळक मुद्देकाही न करता केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती, दरेकरांचा आरोपयापूर्वी काँग्रेसनंही केला होता नामांतराला विरोध

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राजकीय कलगितुरा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी संभाजीनगर या नामांतराला विरोध केला होता. आता यावरून भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी या विषयावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

"औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करणं हा राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असून कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं गेलं पाहिजे. कोणत्याही शहराचं नामांतर करायचं असेल तर महानगरपालिकेचा प्रस्ताव, त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी आणि त्यानंतर केंद्राची मंजुरी अशी प्रक्रिया असते. औरंगाबादचं नामांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिकेत तुमचीच सत्ता आहे. त्या ठिकाणी ठराव करावा आणि मंत्रिमंडळाला तो देण्यात यावा," असं दरेकर म्हणाले. 



"राज्य सरकारचा एकही विषय, एकही दिवस आणि एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कोणतीही गोष्ट असली की केंद्राकडे बोट दाखवलं जात मग तुम्ही राज्य सरकार का चालवता?," असा सवालही त्यांनी केला. महाकाली लेणीसंदर्भात निर्णय घेताना केंद्राला विचारणा केली होती का? आमच्या अस्मितेशी निगडीत कोणताही विषय केंद्र सरकारकडे अडकणार नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी राहू परंतु नाचता येईना, अंगण वाकडं, अशी त्यांची गत झाल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.


सत्तेला अधिक महत्त्व

"बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहिली. काहीही झालं तरी चालेलं. प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर असं नामांतर करू असं म्हटलं होतं. परंतु आता आहे का हिंम्मत? आता त्यांना सत्ता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडे बोट दाखवून जनतेचं लक्ष अधिक काळ विचलित करता येणार नाही," असंही दरेकर म्हणाले. राज्य सरकारनं मंत्रिमंडळात नामांतराचा निर्णय घ्यावा आणि सरकार म्हणून शिफारस करावी. आम्ही केंद्राला मदत करण्यास सांगू. परंतु असं काही करायचं नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचं ही ठरलेली रणनिती आहे. हे न समजण्याइतकी राज्यातील जनता दुधखुळी नसल्याचंही ते म्हणाले.

Web Title: bjp leader slams shiv sena over name change of aurangabad to sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.