Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: “निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:42 PM2023-02-01T17:42:26+5:302023-02-01T17:44:10+5:30

Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

bjp leader sudhir mungantiwar praised modi govt union budget 2023 | Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: “निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: “निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार

Next

Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. यानंतर अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. विरोधक अर्थसंकल्पावर टीका करत असून, सत्ताधारी विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. यातच आता भाजप नेते आणि राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाची सप्तपदी आहे, असे प्रतिपादन केले आहे. 

हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले. 

संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प

नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचा देखील उचित विचार ह्या अर्थसंकल्पाने केला आहे. एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना आणि जग जेव्हा मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे, असे कौतुकोद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठीचा हा अर्थसंकल्प

विकास, वंचित घटनांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित ‘सप्तर्षी योजना’ म्हणून ओळखला जाईल, असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळे देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवीत आणि अंत्योदयाचं पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp leader sudhir mungantiwar praised modi govt union budget 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.