"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:12 PM2020-07-20T15:12:52+5:302020-07-20T15:21:43+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता.

bjp leader sudhir mungantiwar slams Congress NCP shiv sena maha vikas aghadi government | "तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

"तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?"

Next
ठळक मुद्देराज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं जाण्याची चर्चा निर्थक - मुनगंटीवारसरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं - मुनगंटीवारसरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं - मुनगंटीवार

नागपूर - मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकारही पाडलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेला काहीही अर्थ नाही. असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही, तर आघाडी सरकारच्या मनात सरकार पाडलं जाईल याची एवढी भीती का? सरकार पाडणं एवढं सोपं असतं तर देशातल नरेंद्र मोदी सरकार विरोधकांनी केव्हाच पाडलं असतं, असा टोलाही मुनगंटीवारांनी विरोधकांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांना एक मुलाखत दिली. यात त्यांनी ऑपरेशन लोटस, असा उल्लेख करत काही भाष्यही केलं होतं. एवढंच नाही तर राऊतांनीही याच मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला होता. आता हाच धागा धरत सुधीर मुनंगटीवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. मुनगंटीवर म्हणाले, "आघाडी सरकारच्या मनात सरकार पडण्याची एवढी भीती का? असं कोणतंही सरकार पाडता येतं का? सरकार पाडणं एवढं सोपं असतं, तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येत, 24 तास काहीही न खाता-पिता, बैठकांवर बैठका घेत, केंद्रातील मोदी सरकार आतापर्यंत पाडलं असतं. तसंच, तुमचं सरकार बहुमताचं आहे, ते पाडलं जाईल याची एवढी भीती का बाळगता?," असा प्रश्नही मुंगंटीवारांनी केला आहे.

...तर त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्यावात
यापूर्वी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही रविवारी महाविकास आघाडीला टोले लगावले. महाविकास आघाडीमधील काही लोकांना सरकार पडण्याची भीती वाटत आहे. यामुळे त्यांना झोपही लागत नाही. त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्यावात. असं पाटील म्हणाले होते.

पवारांना पाटलांचं उत्तर -
यापूर्वी संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जे 105 आमदार निवडून आले, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेनेची साथ नसती, तर भाजपच्या आमदारांचा आकडा 40 ते 50 पर्यंत खाली घसरला असता, यालाही चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

पावसात भिजण्यापासून सगळं करून झालं. त्यानंतरही राज्यातील निवडणुकीत कोणाच्या किती जागा आल्या हे सर्वांनी पाहिलं आहे. निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वातंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० आणि काँग्रेसचा फक्त १० जागाच आल्या असत्या. तसंच, कुणाची किती ताकद आहे, हे बघायचंच असेल तर पुन्हा सगळे वेगवेगळे लढू. चारही पक्ष वेगवेगळे लढू. कुणाच्या जागा जास्त येतात ते बघू, असं आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी पवारांना दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

Web Title: bjp leader sudhir mungantiwar slams Congress NCP shiv sena maha vikas aghadi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.