Union Budget 2022: “समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:43 PM2022-02-01T17:43:24+5:302022-02-01T17:44:01+5:30

Union Budget 2022: अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा अर्थसंकल्प असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

bjp leader sudhir mungantiwar welcomed and praised union budget 2022 | Union Budget 2022: “समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार

Union Budget 2022: “समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. विरोधक मोदी सरकारवर टीका करत असून, अनेकांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. यातच माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यावर भाष्य करत, समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 

अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भयमुक्त, भुकमुक्त, विषमता मुक्त, रोजगारयुक्त, डिजिटलयुक्त, उर्जयुक्त, समानतायुक्त, सेवायुक्त,  असा दुरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे. २५ वर्षांची राष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट या माध्यमातून अर्थमंत्र्यानी सादर केली असून पुढील शंभर वर्षांच्या मजबूत ढाचा शक्तीशाली पायाभूत सुविधांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पात मांडल्याने आपला देश जागतिक विकासाच्या स्पर्धेत आता मागे राहणार नाही, असा आत्मविश्वास प्रदान करणारा आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.  

सर्वच घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प

शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प म्हणजे समग्र कल्याणाचा संदेश देत गरिबांना सक्षम, बलवान आणि सार्थ्यावन बनविणारा आहे, हे निश्चित. पायाभूत सुविधांचा विचार केल्यास रस्ते महामार्गाच्या विकासाची गती आता २५ हजार किलोमीटर पर्यंत वाढवून तसेच येत्या काळात ४०० वंदे भारत रेल्वे सुरू करून उज्जवल भविष्याची नांदी दिली आहे, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. 

नियोजन नवी क्रांती घडवेल

पीएम ई-विद्याच्या माध्यमातून डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोहचावे, यासाठी २०० चॅनेलचे नियोजन नवी क्रांती घडवेल, असा विश्वास आहे. शेतकऱ्यांचा माल एमएसपी ने खरेदी करणे, ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देणे, ग्रीन एनर्जी किंवा कृषी आधारीत इंधनाला प्रोत्साहन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे ठरेल. हर घर जल, सर्व सामान्य माणसाला स्वस्त घर, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांत पेन्शन समानता, उद्योगाला, स्टार्ट अप ला प्रोत्साहन देऊन, संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया ला प्राधान्य देणे हा आत्मनिर्भर भारत ची यशवी संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी उत्तम पुढाकार आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. 
 

Web Title: bjp leader sudhir mungantiwar welcomed and praised union budget 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.