राणेंना पक्षात घेण्याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा; दीपक केसरकर यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 02:25 PM2017-09-14T14:25:57+5:302017-09-14T14:30:11+5:30

नारायण राणे यांना भाजपात घायचं किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असं मत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

BJP leaders take decision to join Ranee Deepak Kesarkar's statement | राणेंना पक्षात घेण्याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा; दीपक केसरकर यांचं वक्तव्य

राणेंना पक्षात घेण्याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा; दीपक केसरकर यांचं वक्तव्य

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे जेष्ठ नेते नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात लवकरच न्यायालयासमोर यादी सादर होणार आहे.नारायण राणे यांना भाजपात घायचं किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असं मत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

नाशिक, दि. 14- काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायण राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात लवकरच न्यायालयासमोर यादी सादर होणार आहे, त्यामुळे त्यांना भाजपात घायचं किंवा नाही याचा निर्णय राज्यातील भाजपा नेत्यांनी घ्यावा, असं मत राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबाबत झिरो टोलरन्स घोषित केलं आहे. अशावेळी ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातील यादी न्यायालयात सादर होणार आहे. त्यामुळे भाजपाने विचार केला पाहिजे, असंही दीपक केसरकर पुढे म्हणाले.

नाशिक येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय जीएसटी व्यापारी परिषदेनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं. दरम्यान, जीएसटीच्या अंमलबजावणीत व्यापाऱ्यांच्या सोयीचे बदल केले जातील. पण त्यासाठी संयम ठेवा, असंही केसरकर म्हणाले.

नारायण राणे यांचे स्वागतच- चंद्रकांत पाटील
एका कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय राज्यात होऊ शकत नाही, तो दिल्लीतच होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचे भाजपामध्ये स्वागतच आहे. मात्र, प्रवेशाची कोणतीही डेडलाईन नसल्याचे राज्याचे बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.नारायण राणे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी पक्षप्रवेशाबाबत भाजपासमोर कोणत्याही अटी ठेवल्या नाहीत, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
 

Web Title: BJP leaders take decision to join Ranee Deepak Kesarkar's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.