दादरमध्ये शिवसेना-मनसेच्या लढाईत भाजपा आघाडीवर

By admin | Published: February 23, 2017 11:46 AM2017-02-23T11:46:24+5:302017-02-23T11:46:24+5:30

शिवसेना आणि मनसेने प्रतिष्ठेच्या केलेल्या दादरच्या 191 वॉर्डमध्ये भाजपाच्या तेजस्विनी जाधव आघाडीवर आहेत.

The BJP is leading the Shiv Sena-MNS fight in Dadar | दादरमध्ये शिवसेना-मनसेच्या लढाईत भाजपा आघाडीवर

दादरमध्ये शिवसेना-मनसेच्या लढाईत भाजपा आघाडीवर

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 23 - शिवसेना आणि मनसेने प्रतिष्ठेच्या केलेल्या दादरच्या 191 वॉर्डमध्ये भाजपाच्या तेजस्विनी जाधव आघाडीवर आहेत. मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत आणि मनसेच्या स्वप्ना देशपांडे पिछाडीवर पडल्या आहेत. स्वप्ना मनसेचे विद्यमान नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या पत्नी आहेत. 
 
शिवसेना भवन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात असल्याने दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती.2008 पर्यंत हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण 2009 विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई इथून आमदार झाले आणि त्यानंतर चित्रच बदलून गेले. 
 
2012 मध्ये मनसेने येथे क्लीनस्वीप करताना नगरसेवकपदाच्या सर्वच्या सर्व सात मतदारसंघांमध्ये विजय मिळवला.मराठीबहुल या भागामध्ये शिवाजीपार्क, शिवसेना भवनचा परिसर येतो. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून इथे शिवसेनेचे वर्चस्व होते. पण 2009 पासून शिवसेनेच्या या गडाला खिंडार पडले. शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा हा मतदारसंघ आहे.

Web Title: The BJP is leading the Shiv Sena-MNS fight in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.