विधासभेसाठी रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी; म्हणाले, "महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 06:28 PM2024-09-10T18:28:19+5:302024-09-10T18:32:24+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली असून रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

BJP Management Committee Announced for Assembly Elections Raosaheb Danve have a big responsibility | विधासभेसाठी रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी; म्हणाले, "महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी..."

विधासभेसाठी रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी; म्हणाले, "महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी..."

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांची लवकच घोषणा होण्याची शक्यता असल्याने जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या महत्त्वाच्या नेतेमंडळींशी चर्चा केली. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती दानवेंनी दिली.

"महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीची सगळी तयारी भाजपने केली आहे. निवडणुकीच्या पुढील तयारीसाठी भाजपने निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. त्या समितीचा मी प्रमुख आहे. मला विश्वास आहे की भाजप ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल आणि या राज्यात पुन्हा आपले सरकार स्थापन करेल," असे रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या व्यवस्थापन समितीत विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विद्यमान खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांचा समावेश आहे.
 

Web Title: BJP Management Committee Announced for Assembly Elections Raosaheb Danve have a big responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.