भाजपाच्या बैठकीत इच्छुकांनी घातला गोंधळ
By Admin | Published: January 25, 2017 02:58 AM2017-01-25T02:58:28+5:302017-01-25T02:58:28+5:30
भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी जमलेल्या इच्छुकांमध्ये प्रचंड गोंधळ व बेशिस्तीचे दर्शन मंगळवारी सोलापुरात
सोलापूर : भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी जमलेल्या इच्छुकांमध्ये प्रचंड गोंधळ व बेशिस्तीचे दर्शन मंगळवारी सोलापुरात पाहायला मिळाले.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख व खा. शरद बनसोडे हे इच्छुकांच्या मुलाखती घेत होते. सकाळी दहापासून महावीर मंगल कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करताना एकच गर्दी केली. ज्या सभागृहात मुलाखती घ्यायच्या तेथेही सर्व उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपापल्या नेत्याचा जयघोष सुरू केला. नेतेमंडळींच्या समोरच हा गोंधळ सुरू होता, त्यामुळे त्यांना मुलाखतीत ना प्रश्न विचारता येत होते, ना त्यांनी दिलेले उत्तर ऐकू येत होते. अनेकदा कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करूनही कार्यकर्ते शांत होत नव्हते.
अखेर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ब्रेकचे निमित्त करून काही वेळासाठी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले़ (प्रतिनिधी)